'बोल बच्चन'ने कमावले ४ दिवसांत ७२ कोटी - Marathi News 24taas.com

'बोल बच्चन'ने कमावले ४ दिवसांत ७२ कोटी

www.24taas.com, मुंबई
 
अजय देवगण आणि अभिषेक बच्चनच्या बोल बच्चनने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाल केली आहे. रिलीज झाल्या दिवसापासून बोल बच्चनने आत्तापर्यंत ७३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. बोल बच्चनने पहिल्याच दिवशी देशात १२ कोटी १० लाख रुपयांची कमाई केली आहे.
 
दुसऱ्या दिवशीही बोल बच्चनने १२ कोटी रुपयांची कमाई करून यशस्वितेची घोडदौड चालूच ठेवली. भारतात या सिनेमाची कमाई आजपर्यंत ४२ कोटी एवढी झाली आहे. याचबरोबर परदेशातून मिळवलेल्या कमाईचा आकडा जमेस धरला, तर ही कमाई ७२ कोटी ८० लाख रुपये होत आहे.
 
या वर्षी रिलीज झालेल्या सिनेमांपैकी ३ सिनेमांनी १०० कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. पहिला सिनेमा हृतिकचा अग्निपथ असून त्याने १२० कोटी रुपयांची कमाई केली होती. अक्षय कुमारच्या साजिद खान दिग्दर्शित हाऊसफुल्ल-२ या सिनेमाने ११२ कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर अक्षय कुमारच्या रावडी राठोड या सिनेमाने १३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
 
रोहित शेट्टी- अजय देवगण जोडीच्या गोलमाल-३ आणि सिंघम या दोन्ही सिनेमांनीही १०० कोटींचा टप्पा पार केला होता. त्यामुळे बोल बच्चन १०० कोटींचा टटप्पा पार करेल अशीच चिन्हं दिसत आहेत.
 
 

First Published: Tuesday, July 10, 2012, 10:42


comments powered by Disqus