Last Updated: Tuesday, July 10, 2012, 14:43
www.24taas.com, इस्लामाबाद पाकिस्तानात सलमान खानचे लक्षावधी चाहते आहेत, पण सलमानच्या नव्या एक था टायगरला मात्र पाकिस्तानी प्रेक्षक मुकणार आहेत. ‘एक था टायगर’चे प्रोमोज टीव्हीवर दाखवू नयेत, असा आदेश पाकिस्तानी सरकराने देशभरातल्या केबल ऑपरेटर्सना दिला आहे. या सिनेमात पाकिस्तानी आयएसआय संघटनेला नकारात्म पद्धतीने सादर केलं असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथोरिटीने एक पत्र जारी केलं आहे. कुठल्याही सॅटेलाइट चॅनेलने आणि केबल टीव्हीने पाकिस्तानात एक था टायगर सिनेमाचा कुठलाही प्रोमो पाकिस्तानी नागरिकांपुढे येऊ देऊ नये असं या पत्रात सांगण्यात आलं आहे. 15 ऑगस्ट रोजी जभरात प्रदर्शित होणारा एक था टायगर हा सिनेमा RAW आणि ISI यांच्या कारवायांवर आधारित आहे.
“या सिनेमामध्ये इंटर-स्टेट इंटेलिजन्स (ISI) या पाकिस्तानच्या सरकारी संघटनेची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे.” असंही या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी केंद्र सरकारच्या सेंसॉर बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत एक था टायगरचा कुठलाही प्रोमो टीव्ही, रेडिओवरून प्रसारित करायचा नाही असा सरकारी हुकुम आहे.
First Published: Tuesday, July 10, 2012, 14:43