'सिंघम'ची पुन्हा सटकणार! - Marathi News 24taas.com

'सिंघम'ची पुन्हा सटकणार!

www.24taas.com, मुंबई
 
बॉक्स-ऑफिसवरच्या घवघवीत यशाचं गणित काय? ते गणित आहे आहे अजय देवगण + रोहित शेट्टी= ब्लॉकबस्टर यश. आत्तापर्यंत गोलमालचे ३ भाग, ऑल द बेस्ट, सिंघम आणि आत्ताच्या बोल बच्चनने हे सिद्ध करून दाखवलंय. बोल बच्चनच्या यशानंतर आता रोहित शेट्टी अजय़ देवगणला घेऊन कुठला सिनेमा करेल, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. त्याचं उत्तर मिळालंय. नवा सिनेमा आहे पुन्हा ‘सिंघम’च. सिंघम सिनेमाचा सिक्वेल घेऊन शेट्टी-देवगण परत त आहेत.
 
“सिंघम सिनेमामुळे अजय देवगणला पोलिसांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये खूप आदर मिळू लागला आहे. एका टीव्ही चॅनेलवर हा सिनेमा ३५-४० आठवडे दाखवण्यात आला होता. आणि त्याला चांगलाच टीआरपी मिळाला होता. आता आम्हाला नवी कथा मिळाली आहे. ही कथा सिंघमला आणखी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल. म्हणूनच म्ही सिंघम-२ चं काम सुरू करत आहोत.” असं रोहित शेट्टी म्हणाला.
 
पहिला सिंघम हा सिनेमा दक्षिण भारतीय सिंगम या सिनेमाची नक्कल होता. मात्र त्यातील बऱ्याच गोष्टी या मूळ चित्रपटात नव्हत्या. बाजीराव सिंघम या हिरोइतकाच जयकांत शिक्रे हा खलनायकही लोकप्रिय झाला होता. मात्र, आता जो सिक्वेल बनत आहे, तो सिंघ-२ कुठल्याही सिनेमाची नक्कल नसून सर्वस्वी नवा आणि वेगळा सिनेमा असेल.

First Published: Tuesday, July 10, 2012, 17:40


comments powered by Disqus