करीना बनणार पंतप्रधान - Marathi News 24taas.com

करीना बनणार पंतप्रधान

www.24taas.com, मुंबई
 
प्रकाश झा यांच्या 'राजनीती' सिनेमाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची चांगली दाद मिळाली. या सिनेमात कतरिना कैफने साकारलेल्या राजकारणी स्त्रीची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता या राजकारणात प्रकाश झा करीना कपूरला आणत असल्याची चर्चा आहे.
 
झा यांच्या आगामी सिनेमात करीना कपूर अजय देवगणसबत काम करताना दिसेल. सध्या करीनाने सप्टेंबरमध्ये रीलीज होणाऱ्या ‘हिरॉइन’ सिनेमावर आपलं पूर्ण लक्ष केंद्रीत केलंय. या सिनेमानंतर करीना झा यांच्या सिनामात एकदम सामान्य रीतीने पेश होईल. यात तिचं रूप ग्लॅमरस नसेल.
 
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार करीना कपूर या सिनेमात महिला पंतप्रधानांची भूमिका साकरेल. या सिनेमाचं शुटिंग या वर्षा अखेर सुरू होईल. या भूमिकेसाठी करीना कपूरचं नाव अजय देवगणने सुचवलं आहे. ग्लॅमरस न दिसता केवळ अभिनयाच्या ताकदीने आपली भूमिका वठवण्याची जबाबदारी करीनाने यापूर्वी ओमकारा सिनेमात पार पाडली होती. या सिनेमातही अजय देवगणच तिचा सहकलाकार होता.
 
बोल बच्चनच्य़ा यशानंतर सध्या अजय देवगण सातव्या आसमानात आहे. ओमकारा, गोलमाल रिटर्न्स आणि गोलमाल ३ नंतर पुन्हा बेबोसोबत काम करण्यास अजय देवगण उत्सुक आहे. त्यामुळे आता छम्मक छल्लो करीना गंभीर पंतप्रधानांची भूमिका कशी करेल हे पाहाण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल.

First Published: Wednesday, July 11, 2012, 09:53


comments powered by Disqus