'सैफिना'चं लग्न पुन्हा लांबणीवर - Marathi News 24taas.com

'सैफिना'चं लग्न पुन्हा लांबणीवर

www.24taas.com, मुंबई
 
आई शर्मिला टागोर यांनी काही दिवसांपूर्वीच आपला मुलगा सैफ अली खान आणि करीना कपूर १६ ऑक्टोबर रोजी विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती दिली होती. सैफची बहीण सोहानेही ट्विटरवरून या तारखेला पुष्टी दिली होती. सगळेच जण १६ ऑक्टोबरला होणाऱ्या सैफ आणि बेबोच्या विवाहाची वाट पाहात होते. मात्र, आता पुन्हा सैफ आणि करीनाने आपला विवाह पुढे ढकलला आहे.
 
“आम्ही अद्याप लग्नासाठी कुठलीही तारीख ठरवलेली नाही. मला अजून करीनाच्या घरच्यांशी लग्नासंबंधी बोलणी करायची आहेत. स्थळ ठरवायचं आहे. हे लग्न कदाचित या वर्षा अखेर होईल. पण इतक्यात लग्न होणार नाही.” अशी माहिती खुद्द सैफ अली खानने मीडियाला दिली आहे.
 
सगळ्यांनाच या लग्नाची घाई आहे, हे मला माहित आहे. पण १६ ऑक्टोबरला आम्ही लग्न करणार नसून ते नंतर करू. असं सैफने सांगून पुन्हा लग्नाची तारीख लांबणीवर ढकलली आहे. सैफ-करीना नक्की कधी लग्न करणार आहेत, याची तमाम चाहत्यांना उत्सुकता आहे. आपलं जोरदार चालू असणाऱ्या करीअरा ब्रेक देऊन करीना आत्ता विवाहबंधनात अडकणार नाही, असाच काही जणांचा होरा होता. याआधी एजंट विनोद सिनेमाच्या रिलीजनंतर सैफिना लग्न करणार होते. त्यानंतर करीना हिरॉइन सिनेमाच्या शुटिंगमुळे लग्नास उशीर करत होती. आताही नेमकं काय घडलंय हे कुणी सांगत नाही. नुकतंच संजय लीला भंसाळीने करीनाला त्याच्या राम लीला सिनेमातून दिलेल्या डच्चू दिला. या डच्चूचं एक कारण तिचं होणारं लग्न असल्याचं सांगितलं जात होतं. कदाचित याच कारणामुले तर करीनाने आपलं लग्न लांबणीवर नसेल ना टाकलं?

First Published: Wednesday, July 11, 2012, 16:59


comments powered by Disqus