राजेश खन्नांची प्रकृती अधिकच खालावली - Marathi News 24taas.com

राजेश खन्नांची प्रकृती अधिकच खालावली

www.24taas.com, मुंबई
 
बॉलिवूड सुपरस्‍टार राजेश खन्ना यांची प्रकृती  अधिकच खालावली आहे. त्यांची प्रकृती अतिशय नाजूक असून त्यांनी अन्नपाणी सोडले आहे. तसेत ते औषधांनाही काहीही प्रतिसाद देत नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
 
उपचारांना काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ करण्‍यात आली आहे. गेल्याच आठवड्यात  राजेश खन्ना यांना लिलावती रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले होते.  त्यांना यकृताचा विकार झाल्याचे  सांगितले होते. सोमवारीच त्यांना रुग्‍णालातून सुटी देण्‍यात आली होती. मुलगी ट्विंकल खन्ना आणि जावई अक्षय कुमार हे त्यांना घरी घेऊन गेले होते.  ते केवळ फलाहार आणि रसाचेच सेवन करीत होते, अशी माहिती देण्यात आली. पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्याने आज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
गेल्या दोन महिन्यात त्यांना चारवेळा रूग्णालयात दाखल करण्यात आले. राजेश खन्ना यांना अशक्तपणा असून काळजी करण्याचे कारण नाही, असे त्यांच्या कुटुंबियांकडून वारंवार सांगण्यात आले. मात्र त्यांची तब्येत वारंवार ढासळतच असल्याचे आज सांगण्यात आले.

First Published: Wednesday, July 18, 2012, 13:40


comments powered by Disqus