Last Updated: Thursday, July 19, 2012, 11:12
www.24taas.com, मुंबई 
पॉर्न स्टार सनी लिऑनचा जिस्म-२ ह्या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने 'ए' प्रमाणपत्र दिल्याने आता त्याच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आपला हा आनंद पूजा भट्टने ट्विटरवर व्यक्त केला. सिनेमाची दिग्दर्शिका पूजा भट्टच म्हणणं आहे की, मी ह्या सिनेमात माझ्या मनाप्रमाणे हवे ते बदल केले आहेत , आणि तरीही त्यात कोणतेही बदल न करता सेंन्सॉर बोर्डाने त्याला 'ए' प्रमाणपत्र दिल्याने मला फारच आनंद झाला आहे.
पूजा भट्टच म्हणणं आहे की, मला जसं हवं तशीच सिनेमाची बांधणी केली आहे. त्यामुळे कोणत्याही बदलाशिवाय हा सिनेमा पाहता येणार आहे. आणि त्यामुळे पूजा जी दृश्य हवी होती ती यात दाखविण्यात येणार आहे. म्हणजेच तिला हवी ती दृश्य या सिनेमात घेण्यात आल्याने ती भलतीच खूश आहे.
२००३ मध्ये आलेल्या जिस्म सिनेमाचा जिस्म - २ सिक्वेल आहे. आणि जिस्म सिनेमापेक्षाही जास्त उत्तजेक दृश्य ह्यात आहेत. यात सनी लिऑनने आपल्या हॉट आणि बोल्ड सिनने सिनेमाची चवच बदलून टाकली आहे. त्यामुळे हा सिनेमा अडल्टच आहे. त्यामुळे १८ वर्षावरील लोकांची हा सिनेमा पाहावा असं म्हटलं आहे.
First Published: Thursday, July 19, 2012, 11:12