Last Updated: Thursday, July 19, 2012, 16:41
www.24taas.com, मुंबई आपल्या आवडत्या व्यक्तींना महागड्या भेटवस्तू देण्याबद्दल सलमान खान प्रसिद्धच आहे. त्यात जेव्हा त्याची ‘मैत्रीण’ कतरिना कैफ हिचा वाढदिवस असेल, तेव्हा तर सलमान पैशाचा विचार न करता तिला भेटवस्तू देणार हे तर नक्कीच..अगदी कतरिनाशी सलमानचा ब्रेक अप झाला असला तरीही कतरिनासाठी गिफ्ट घेण्यात मात्र सलमानने कुठलीही कंजुषी केली नाही.
१६ जुलैला आपल्या २८व्या वाढददिवशी कतरिनाला पार्टीसाठी वेळच नव्हता. तरीही रात्री उशीरासलमानच्या कुटुंबासोबत कतरिनाने डिनर केलं. यावेळी आणखी कशाप्रकारे सेलिब्रेशन केलं याची माहिती नसली, तरी सल्लूने तिला ऑडी एसयूव्ही ही महागडी कार गिफ्ट केली असल्याचं सांगितलं जातंय.
कतरिना याच कारमधून राजेश खन्ना यांच्या अंत्यदर्शनाला आली होती. ऑडीची एवढी महागडी कार गिफ्ट देणाऱ्या सलमानबद्दल काय बोलणार? पण कतरिना मात्र खूपच लकी आहे, एवढं मात्र नक्की.
First Published: Thursday, July 19, 2012, 16:41