अमिताभच्या घरात चोर शिरला अन्... - Marathi News 24taas.com

अमिताभच्या घरात चोर शिरला अन्...

www.24taas.com, मुंबई
 
'चोर मचाये शोर' असं म्हणताये खुद्द 'बिग बी', अहो ते गाणं नाही म्हणत तर त्यांच्या घरातच 'जलसा' बंगल्यात चोर घुसला होता. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यात शनिवारी रात्री चोर घुसल्याने खळबळ उडाली. झाडावर चढून ‘जलसा’त घुसलेल्या चोरट्याने रोकड चोरली. पण बंगल्यातून निसटण्यापूर्वीच तेथील सुरक्षारक्षकांनी त्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या चोराने मात्रा उलटाच ‘शोर’ केला.
 
मी अभिताभ बच्चन यांचा मोठा फॅन आहे. यासाठीच त्यांना भेटण्यासाठी मी झाडावर चढून बंगल्यात घुसण्याचा आटापिटा केला, असे तो म्हणाला. मात्र पैसे चोरण्यासाठीच तो बंगल्यात घुसला असून त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, बंगल्यात कोणीतरी घुसले होते.
 
त्याला पकडण्यात आले असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र कडक सुरक्षा व्यवस्था आणि एवढी सावधानता बाळगूनही ही व्यक्ती घरात पोहोचली असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी चिंता व्यक्त केली आहे.
 
 
 
 
 

First Published: Tuesday, July 24, 2012, 09:21


comments powered by Disqus