सलमान खानला तीन वर्षांची शिक्षा? - Marathi News 24taas.com

सलमान खानला तीन वर्षांची शिक्षा?

www.24taas.com , मुंबई
 
बॉलिवुडचा अभिनेता सलमान खान पुन्हा अडचणीत सापडला आहे. काळवीटची शिकार केल्याप्रकरणी सल्लू मियॉला तीन वर्षांची शिक्षा होवू शकते. जर अशी शिक्षा झाली तर त्याला तुरूंगाची हवा खायला लागेल.
 
राजस्थानमध्ये शुटींगच्या दरम्यान सलमान खान याने काळवीट या हरणाची शिकार केली होती. त्याच्यासोबत सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे हेही होते. त्यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले आहेत.
 
काळवीटाच्या शिकारप्रकरणी सलमानवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्याबाबत अंतिम सुनावणी होणार आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने दोन दिवसांपर्वी  काळवीट शिकार या प्रकरणाबाबत अंतिम निर्णय घेतला आहे. सलमान आणि त्याचे सहकारी आरोपी यांच्यावरील १४ वर्षांपूर्वीचा खटल्याला अंतिर रूप दिले आहे. त्यामुळे आता अंतिम सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
सलमान खानला वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी कायद्याचा आधार घेण्यात आला आहे. या कायद्याच्या ५१ कलमानुसार १४९ नुसार आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार सलमानला तीन वर्षांची शिक्षा किंवा दंड होऊ शकतो. तसेच या दोन्ही शिक्षा होवू शकतात. तसेच सलमानच्या सहकाऱ्यांवर आरोप निश्चित झाले तर त्यांनाही तीन वर्षांची शिक्षा होवू शकते.

First Published: Thursday, July 26, 2012, 12:33


comments powered by Disqus