Last Updated: Thursday, July 26, 2012, 19:25
www.24taas.com, मुंबई 
सध्या झटपट प्रसिद्धीसाठी प्रत्येक मॉडेल इतकी हापापलेली असते की, त्यासाठी ती काहीही करू शकते. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठ ही पूनम पांडेंच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. पूनम प्रमाणे गहना देखील न्यूड झाली आहे. त्यामुळे गहना आणि पूनममध्ये पुन्हा एकदा स्पर्धा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी तिरंगा गुंडाळून गहनाने फोटोशूट केले होते. त्यानंतर तिला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. लोकांनी तिला मारहाण केली होती. त्यामुळे तिला दुखापतही झाली होती. मात्र त्यातूनही गहनाने धडा घेतलेला दिसत नाही. गहना पुन्हा न्यूड होऊन पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
गहनाची मागची न्यूड छायाचित्रे तिचा मॅनेजर हेमंत दासगुप्ताने लीक केल्याचे नंतर समोर आले होते. आता पुन्हा एकदा गहनाने न्यूड होण्याचे धाडस केले आहे. न्यूड होऊन गहना स्ट्रिपिंक क्विन्सच्या लिस्टमध्ये सामील झाली आहे. या लिस्टमध्ये पूनम पांडे, शर्लिन चोप्रा आणि रोजलिन खान यांचा समावेश आहे.
First Published: Thursday, July 26, 2012, 19:25