Last Updated: Saturday, July 28, 2012, 13:55
www.24taas.com, मुंबई ‘क्या सुपरकूल है हम...’ म्हणणारा लाजरा-बुजरा तुषार कपूर आता खरोखरच सुपरकूल झालेला दिसतोय. त्याचा टायगर जोक आता अनेकांच्या तोंडी खेळताना दिसतोय.
झालं असं की, नुकताच तुषार कपूरनं त्याची सहकलाकार नेहा शर्मा हिच्यासोबत एक फॅशन शोला उपस्थिती लावली. इथं पत्रकारांनी त्याला गाठलं. मग काय, झाल्या थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा टप्पा सुरू... आणि ‘क्या सुपरकूल है हम...’च्या प्रमोषणासाठी आलेला तुषार त्याच्या सुपरकूल भूमिकेत शिरला (सिनेमाचं शूट नव्हतं, तरी न्यूज चॅनल्सचे कॅमेरे सुरू होते, हे माहित होतं ना त्याला). आणि या सुपरकूल बनण्याच्या नादात त्यानं डायरेक्ट निशाना साधला सध्याच्या ‘टायगर’वर… अहो, कोण काय विचारताय? त्याचा निशाना होता दबंग सलमान खानवर...
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना तुषारनं म्हटलं की, ‘मला नेहा शर्मासारख्या ‘तरुण’ अभिनेत्रींबरोबर काम करायला खूप आवडतं. त्यांच्यामुळे मलाही तरुण झाल्यासारखं वाटतं’... तुषारच्या या वाक्यावर मात्र चौकसबुद्धी पत्रकारांचे कान टवकारले. त्यांनी लगेच त्याला लग्नासंबंधी दुसरा प्रश्न विचारला. यावर तुषारनं उत्तर काय दिलं माहित आहे?… तुषार म्हणाला ‘अरे पण फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक लोक आहेत जे माझ्यापेक्षा वयस्कर लोक आहेत ज्यांची अजून लग्न झालेली नाहीत. मला कुणाचं नाव घ्यायचं नाहीय पण, मी काही इंडस्ट्रीतला एकटाच ‘टायगर’ नाही ना!’... यावर ज्यांना ज्यांना तुषारचा हा टायगर जोक कळला त्यांनी त्यांनी मनसोक्त हसून घेतलं...
.
First Published: Saturday, July 28, 2012, 13:55