Last Updated: Saturday, July 28, 2012, 19:10
www.24taas.com, मुंबई एका सर्वेक्षणानुसार बॉलिवूडच्या कलाकारांपैकी जॉन अब्रहम याला 'बेस्ट बीच बॉडी' आणि अनुष्का शर्मा हिला 'बेस्ट बिकिनी बॉडी'चा किताब देण्यात आला आहे.एका वेबसाइटतर्फे झालेल्या या सर्वेक्षणात आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींपैकी हेच किताब डेव्हिड बेकहम आणि जेसिका अल्बा यांना देण्यात आले आहेत.
या सर्वेक्षणात लोकांनी दिलेल्या मतांनुसार ११% मतांनी अनुष्का शर्माने पहिलं स्थान मिळवलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर सनी लिऑन आणि दीपिका पदुकोण या दोघीही आहेत. तर तिसऱ्या स्थानावर बिपाशा बासू आणि प्रियंका चौप्रा या दोघी आहेत.
पुरूषांसाठी झालेल्या सर्वेक्षणात जॉन अब्रहमला २०% मतं मिळून त्याने पहिला नंबर पटकावला आहे. तर, १७% मतं मिळवून हृतिक रोशन दुसऱ्या स्थानावर आहे. ७% मतं मिळवून सलमान खानने तिसऱ्या नंबरवर जागा मिळवली आहे.
First Published: Saturday, July 28, 2012, 19:10