Last Updated: Saturday, December 17, 2011, 09:08
झी २४ तास वेब टीम, मुंबई पाकिस्तानी वादग्रस्त अभिनेत्री वीणा मलिक गेल्या २४ तासांपासून बेपत्ता आहे. विणाचा मॅनेजर प्रतिकनं याबाबतची माहिती वांद्रे पोलिसांना दिलीय.
तिच्या 'मुंबई १२५ किमी' या सिनेमाचे मुंबईत शुटींग सुरु होते. शुक्रवारी सकाळी शुटींग संपल्यानंतर सहा वाजल्यापासून तिचा ठावठिकाणा समजत नाही. तिचा मोबाईल फोनही बंद आहे. कुणाच्या तरी कारमध्ये बसून ती गेलीय. सिनेमाच्या शुटींगसाठी काल संध्याकाळी विणा येणार होती. मात्र ती न आल्यानं तिची शोधाशोध सुरु झाली.
मॅनेजर प्रतिकनं विणाच्या घरी तसंच विणाचा जवळचा मित्र अश्मित पटेल घरी चौकशी केली. मात्र कुणालाही विणा कुठं आहे ते माहित नाही. तिच्या बोल्ड अदाकारीवर पाकिस्तानात बरीच टीकाही झाली होती. त्यामुळं पाकिस्तानात तिला कट्टर धर्मवाद्यांकडून धमक्याही येत असल्याचं बोललं जातंय.
First Published: Saturday, December 17, 2011, 09:08