लोकांनी करावी माझ्या अभिनयाची तारीफ- सनी - Marathi News 24taas.com

लोकांनी करावी माझ्या अभिनयाची तारीफ- सनी

www.24taas.com, मुंबई
 
आपल्या पहिल्या-वहिल्या बॉलिवूड फिल्म ‘जिस्म-२’च्या प्रमोशनसाठी पॉर्न स्टार सनी लिऑन भारतात परतली आहे. या सिनेमाचं शुटिंग संपल्यावर सनी अमेरिकेला निघून गेली होती. जिस्म-२चे प्रोमो आता इंटरनेटवर आणि टीव्हीवर दाखवण्यास सुरूवात झाली आहे. या सिनेमाबद्दलची लोकांमधली उत्सुकता वाढत आहे.
 
सनी लिऑनला तिच्या पॉर्न स्टार स्टेटसबद्दल विचारलं असता सनी म्हणाली, “मला माझ्या पॉर्न स्टार स्टेटसवर फिदा होऊनच ‘जिस्म-२’साठी विचारणा झाली होती. मात्र या सिनेमातून माझी ओळख केवळ एक पॉर्न स्टार न राहाता अभिनेत्री म्हणूनही व्हावी असं मला वाटतं. मी अभिनयावर प्रचंड मेहनत घेतली आहे. ती लोकांच्या लक्षात यावी आणि सिनेमा पाहून त्यांनी माझ्या अभिनयाचं कौतुक करावं. असं मला वाटतं.”
 
जिस्म-२ ही इश्ना नामक एका पॉर्न स्टारची कहाणी आहे. इझ्नाला एका गुन्हेगाराला जाळ्यात अडकवण्याच्या कामी नियुक्त केलं असतं. या मिशनमध्ये पुढे काय होतं, हे या सिनेमात पाहायला मिळतं. ३ ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

First Published: Tuesday, July 31, 2012, 08:38


comments powered by Disqus