Last Updated: Tuesday, July 31, 2012, 09:31
www.24taas.com 
पॉर्न स्टार सनी लिऑन हे गेले काही दिवस बरीच चर्चेत आहेत. तिच्या जिस्म -२ या सिनेमात तिने दिलेल्या हॉट सिनमुळे तर फारच चर्चा रंगली आहे. ३ ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होत आहे. या चित्रपटात सनीने अरुणोदय सिंग आणि रणदीप हुड्डा यांच्याबरोबर अनेक बोल्ड सीन दिले आहे.
पण हे बोल्ड सीन्स करण्यापूर्वी सनीने 'जिस्म २' च्या निर्मात्यांना एक अट घातली होती. सनीने पूजा भट्टला एक वेगळीच अट घातली होती. एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दावा केला आहे की, चित्रपटातील लव्ह मेकिंग सीन शुट करण्यापूर्वी सनीने पूजाकडे रणदीप आणि अरुणोदय सिंगचे एचआयव्ही रिपोर्ट मागितले होते. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होण्यापूर्वी सनीने पूजाला एक मेल पाठवला होता.
या मेलमध्ये रणदीप आणि अरुणोदयबरोबर लव्ह मेकिंग सीन्स करण्यापूर्वी या दोघांचे मेडिकल रिपोर्ट्स तिला पाठवण्यात यावे अशी मागणी सनीने पूजा भट्टमध्ये केली होती. इतकेच नव्हे तर सनीने स्वतःच्या मेडिकल रिपोर्ट्सची कॉपी पूजाकडे पाठवली होती. सनीच्या या मागणीवर चित्रपटात एकाही अभिनेत्याबरोबर तुझे बेड सीन नाही, त्यामुळे मेडिकल सर्टिफिकेटची गरज पडणार नाही, असे पूजाने सनीला सांगितले होते.
First Published: Tuesday, July 31, 2012, 09:31