अती सेक्स करणं धोकादायक- सनी लिऑन - Marathi News 24taas.com

अती सेक्स करणं धोकादायक- सनी लिऑन

www.24taas.com
 
पॉर्न स्टार सनी लिऑन हिचं म्हणणं आहे की, जास्त सेक्स करणं ही अत्यंत वाईट आहे. सनी जास्त सेक्स करण्याच्या विरोधात आहे. पोर्न स्टार सनी लिऑनचे म्हणणे आहे की, अधिक सेक्स करणे धोकादायक होऊ शकते. यासोबतच सनीने प्राण्यांच्या नसबंदीचे समर्थन केले आहे.
 
प्राण्यांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या पेटा संस्थेच्या नव्या जाहिरातीत ती कुत्रे आणि मांजरांची नसबंदी करण्याचे अपील करताना दिसणार आहे. सनीचे म्हणणे आहे की, 'मोकाट कुत्रे आणि मांजर यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी त्यांची नसबंदी करणे अत्यंत गरजेचे आहे.
 
जर आम्ही आमच्या पाळीव प्राण्यांना, विशेषतः कुत्र्यांना 'अधिक सेक्स' करण्यासाठी मोकळे सोडले आणि त्यांची नसबंदी केली नाही तर, रस्त्यांवर, गल्ली-बोळात त्यांचा सुळसुळाट होईल.'
 
 
 
 
 

First Published: Tuesday, July 31, 2012, 13:36


comments powered by Disqus