Last Updated: Wednesday, August 1, 2012, 13:00
www.24taas.com, मुंबई जिस्म-२च्या पोस्टरमधील पांढऱ्या, ओल्या चादरीतील ती अभिनेत्री कोण? यावर बरेच दिवस लोकांमध्ये उत्सुकता होती. अखेर त्या अभिनेत्रीवरून ‘चादर’ दूर झाली आहे.
या सिनेमातील अभिनेत्री सनी लिऑनच या चादरीमध्ये असावी, असा बऱ्याचजणांचा कयास होता. दिग्दर्शिका पूजा भट्ट आणि निर्माते महेश भट्ट यांनीही ‘ती’ अभिनेत्री नक्की कोण याबाबतीत मौनच बाळगलं. सनी लिऑनने आपले चादर गुंडाळलेलेच काही फोटो ट्विटरवर अपलोड केले. त्यामुळे पोस्टरवरील अभिनेत्री सनी लिऑनच असेल, अशी सगळ्यांची खात्री पटली. मात्र ती सनी लिऑन नसून ‘नतालिया कौर’ ही अभिनेत्री आहे.

वर्षभरापूर्वी जेव्हा सनी लिऑन जिस्म-२साठी काम करण्याचं कुणाच्या डोक्यातही नव्हतं तेव्हा पूजा भट्टने नतालियाकडून हे फोटोशूट करवून घेतलं होतं. बिपाशा बासू किंवा मल्लिका शेरावत या फिल्ममध्ये काम करणार होत्या. जोपर्यत अभिनेत्रीचं नाव नक्की होत नाही, तोपर्यंत लोकांना ‘नेत्रसुख’ मिळावं यासाठी नतालिया कौरला घेऊन पूजा भट्टच्या फार्महाऊसवर हे फोटोशूट केलं गेलं. नतालिया कौर हिने राम गोपाल वर्माच्या ‘डिपार्टमेंट’ सिनेमात हॉट आयटम साँग केलं होतं.
First Published: Wednesday, August 1, 2012, 13:00