Last Updated: Saturday, December 17, 2011, 13:05
झी २४ तास वेब टीम, मुंबई रोबोट सिनेमामध्ये आपण रजनीकांत यांच्यासह ऐश्वर्याचाही जलवा पाहिला. खरंतर या सिनेमात ऐशने रजनीकांत यांच्यासह काम करायला होकार दिल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. कारण साठी पार केलेल्या रजनीकांत यांच्यासह रोमॅन्टिक भूमिका करणं म्हणजे तसं धाडसीच होतं. मात्र रजनीकांत यांनी भेट अमिताभ बच्चन यांच्यापुढेच याबाबत शब्द टाकल्यावर ऐश्वर्याला हा सिनेमा करावालच लागला.
मात्र, 'रोबोट' सिनेमामध्ये या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूपच रंगली आणि आता हीच केमेस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर दिसणारेय. कारण आगामी एका सिनेमामध्ये ऐश्वर्याने गेस्ट अपिरन्स करावा अशी इच्छा पुन्हा एकदा रजनीकांत यांनी व्यक्त केलीय त्यामुळे रोबोटच्या यशानंतर ऐश पुन्हा एकदा रजनीकांत यांच्यासह काम करेल अशीच चिन्हं दिसतायत मात्र या सिनेमाच्या शूटिंगसाठी रजनीकांत यांना थोडी प्रतिक्षा करावी लागेल कारण ऐश्वर्याला मुलगी झाल्यानंतर तिने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतलाय.तेव्हा आता वाट पाहूयात ती ऐशच्या कमबॅकची
First Published: Saturday, December 17, 2011, 13:05