Last Updated: Thursday, August 2, 2012, 12:08
www.24taas.com, मुंबई आपल्या पक्षात कलाकारांचं ग्लॅमर आणण्याचा प्रकार नवीन नाही. गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही जुही चावला हिला आगामी विधानसभा निवडणुकीत उभं राहाण्याची विनंती केली होती. मात्र जुही चावलाने नरेंद्र मोदींना चक्क नकार दिला.
गुजरातमध्ये काँग्रेस आमदार अर्जुन मोडवाडिया यांच्या विरोधात भाजपातर्फे जुहीने निवडणूक लढवावी, अशी मोदींनी जुहीला विनंती केली होती. पण, आपला राजकारणात येण्याचा अजिबात विचार नसल्याचं सांगत जुहीने मोदींना नम्र नकार दिला. आपण बॉलिवूड अभिनेत्री असून राजकारणात शिरण्यायोग्य आपण नाही असं जुही म्हणाली.
जुही सध्या ‘कृष्णा आणि कंस’ या अॅनिमेटेड सिनेमासाठी यशोदेचा आवाज देत आहे. दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या सन ऑफ सरदार सिनेमातही जुही चावला पाहायला मिळेल. त्यामुळे आपण बॉलिवूड आणि आपला संसार, दोन्ही मुलं यांच्यात व्यस्त असून आपल्याला राजकारणात यायची इच्छा नाही असं जुही चावलाने सांगितलं आहे.
First Published: Thursday, August 2, 2012, 12:08