मुंबईतून जिस्म-२च्या सनीचे पोस्टर हटवणार - Marathi News 24taas.com

मुंबईतून जिस्म-२च्या सनीचे पोस्टर हटवणार

www.24taas.com, मुंबई
 
सनी लिऑन ह्या पॉर्न स्टारमुळे जिस्म -२ हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच बराच चर्चेत राहिला आहे. मात्र आता हाच जिस्म - २ सिनेमा मुंबईतून हद्दपार होणार आहे. जिस्म-२ चे पोस्टर्स हे बरेच भडक आहेत. आणि त्यामुळेच हे पोस्टर काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खुद्द मुंबईच्या महापौरांनी हे आदेश दिले आहेत.
 
राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी यासंदर्भात पालिकेला पत्र लिहिलं होतं. ज्यात जिस्म-२ चे पोस्टर्स हे अतिशय अश्लील असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. हे पोस्टर्स बेस्ट बसेसवरही लावण्यात आले होते.
 
हे पोस्टर्स काढून टाकण्याची मागणी विद्या चव्हाण यांनी आपल्या पत्रात केली होती. पोर्नस्टार सनी लिऑन जिस्म-२ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. शुक्रवारी ३ ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
 
 
 

First Published: Thursday, August 2, 2012, 13:13


comments powered by Disqus