...आणि सनी लिऑनला रडू कोसळले - Marathi News 24taas.com

...आणि सनी लिऑनला रडू कोसळले

www.24taas.com, मुंबई
 
'जिस्म-२' आज रिलीज झाला. या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या सनी लिऑनशी झी न्यूजच्या वेब टीमशी बातचित केली. यावेळी आपल्या पहिल्याच सिनेमाला मिळत असलेल्या प्रतिसादाने आपल्याला खूप आनंद झाल्याचं मत सनी लिऑनने व्यक्त केलं.
 
या सिनेमाच्या प्रतिसादाबद्दल विचारलं असता सनी उत्तरली, “जिस्म-२ या सिनेमाचा एक भाग बनल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतोय. हा सिनेमा पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. माझ्या कामाबद्दल लोक काय म्हणतील याचा विचार करून मी रडत नव्हते. मला रडू कोसळलं, कारण तो माझ्यासाठी एक अभिमानाचा क्षण होता. हा माझा असा पहिला सिनेमा आहे, जो मी माझ्या संपूर्ण कुटुंबासह पाहू शकते. नवऱ्यासोबत बसून मी हा सिनेमा पाहिला. त्यानंतर मी फोन करून आई-वडिलांशीह बोलले आणि त्यांनाही सांगितलं, की हा सिनेमा तुम्ही पाहू शकता.”
 
मला बिग बॉसमध्ये मला पाहून निर्माते महेश भट्ट खूश झाले होते आणि तिथेच त्यांनी मला सिनेमासाठी करारबद्ध केलं. फूजा भट्टने ज्या पद्धतीने काम करण्यास सांगितलं, त्याच पद्धतीने मी काम केलं असही सनी लिऑन म्हणाली.

First Published: Friday, August 3, 2012, 13:29


comments powered by Disqus