नक्की वीणा गेली कुणीकडे....??? - Marathi News 24taas.com

नक्की वीणा गेली कुणीकडे....???

झी २४ तास वेब टीम
 
पाकिस्तानी वादग्रस्त अभिनेत्री आणि बिग बॉसमुळे चर्चेत आलेली मॉडेल-अभिनेत्री वीणा मलिक गायब झाल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत होती.. मात्र, आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळणार असंच दिसतं आहे. कारण, वीणा मलिक सापडल्याची चर्चा आहे... ती पाकिस्तानातच असल्याचं म्हटलं जातं आहे...
 
'द नेशन' या वृत्तपत्रानं ही माहिती दिल्याचं बोललं जातं आहे. तिच्या 'मुंबई १२५ किमी' या सिनेमाचं मुंबईत शुटिंग सुरु होतं.. मात्र, शुटिंग संपल्यानंतर सहा वाजल्यापासून तिचा ठावठिकाणा समजत नव्हता.. मात्र, आता ती पाकिस्तानात असल्याचं म्हटलं जातं आहे. इतकंच नाही तर विसा संपल्यानं ती पुन्हा पाकिस्तानात परतल्याचं म्हटलं जातं आहे.
 
त्यामुळे वीणा मलिक पाकिस्तानात गेली हे जवळजवळ निश्चित आहे. इंग्लिश वृत्तपत्र 'द नेशन' यांच्या माहितीनुसार वीणा पाकिस्तानात गेली असल्याचे म्हटले आहे. २४ तारखेला वीणा मलिकचा व्हिसा संपुष्टात येणार होता. गेल्या दोन दिवसांपासून ती मुंबईतील गोरेगाव भागातून मधून बेपत्ता होती. तिच्या सोबत अश्मित पटेल हा देखील तिच्यासोबत असल्याचे द नेशनने म्हटले आहे. वीणा अश्मित सोबत वाघा बॉर्डर पर्यंत गेली असल्यांचे सांगितले जात आहे.

First Published: Sunday, December 18, 2011, 06:52


comments powered by Disqus