Last Updated: Friday, August 3, 2012, 17:46
www.24taas.com, मुंबई पुजा भट्ट निर्मित आणि सनी लिऑनचा हॉट सिनेमा जिस्म-२ आज प्रदर्शीत झाला. मात्र, या चित्रपटाच्या बेस्ट बस आणि थांब्यावर लावण्यात आलेल्या जिस्म -२ या चित्रपटाच्या अश्लिल जाहिराती हटवण्यात आल्या आहेत.
या जाहिरातींबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी यांनी निवेदनाद्वारे तक्रार केल्यानंतर महापौर सुनील प्रभू यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांना पत्र पाठवून या जाहिराती त्वरीत हटवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार बेस्ट प्रशासनाने राकेश अॅडव्हर्टाइझ या कंपनीला अश्लील जाहिराती हटवण्यास सांगितल्यानंतर त्या काढून टाकण्यात आल्या.
याबाबत आमदार चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. समाजामध्ये महिलांवर होणारे अत्याचार होत असताना अशा प्रकारे जाहिराती दाखवून समाजाच्या भावना भडकवल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या जाहिराती हटवल्याने बेस्टचे नुकसान होणार नसून त्या जागी दुस-या जाहिराती लावण्यात येणार असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक गुप्ता यांनी सांगितले.
First Published: Friday, August 3, 2012, 17:46