जॅकी श्रॉफच्या मुलाची 'हिरोपनती' - Marathi News 24taas.com

जॅकी श्रॉफच्या मुलाची 'हिरोपनती'

www.24taas.com, मुंबई
 
सध्या सनी लिऑनच्या ‘जिस्म-2’च्या पोस्टर्सनी शहरात धुमाकूळ घातला असताना 'हिरोपनती' या नव्या सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर आलंय. यात हिरॉइन नाही, तर हिरोचंच उघडं शरीर आहे. कोण हे हा हिरो?
 
‘हिरोपनती’ या सिनेमातून जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. टायगरच्या पहिल्याच सिनेमाचं नावही ‘हिरोपनती’ हे जॉकी श्रॉफ याच्या पहिल्या फिल्म ‘हिरो’शी साधर्म्य साधणारं आहे. हा योगायोग आहे की प्रयत्नपूर्वक करून घेतलेलं नामकरण आहे, माहित नाही. पण हा लाजाळू टायगर वडिलांकडून सध्या हिरोगिरीचे धडे गिरवतोय.
 
पण पोस्टरवर दिसणाऱ्या टायगरने चक्क आमिर खानला बॉडी बिल्डिंगचे धडे दिले आहेत. धूम-3साठी आमिर खानने बनवलेलं शरीरसौष्ठव हे टायगरच्या ट्रेनिंगमधून साकारलं आहे. त्यामुळे टायगरची बॉडी चांगली आहे, हे पोस्टरवरूनही दिसतंय. आता त्याचा अभिनय कसा असेल, तेच बघायचंय..
 

First Published: Saturday, August 4, 2012, 13:41


comments powered by Disqus