'जिस्म-3'त ब्राझीलियन मॉडेल नथालिया - Marathi News 24taas.com

'जिस्म-3'त ब्राझीलियन मॉडेल नथालिया

www.24taas.com,  मुंबई
 
पॉर्न स्टार सनी लिओनने आपला जलवा 'जिस्म-२ ' दाखविल्यानंतर आता 'जिस्म-3' ब्राझीलियन मॉडेल नथालिया कौर आपला जलवा दाखविणार आहे. त्यामुळे सनी आणि नथालिया यांच्यातील चुरस वाढीला लागली आहे.
 
पूजा भट्ट दिग्दर्शित 'जिस्म'च्या पुढील भागामध्ये भारतीय वंशाची ब्राझीलियन मॉडेल नथालिया कौर प्रमुख भूमिकेत राहणार आहे.  'जिस्म'च्या  पहिल्या आणि दुसऱ्या भागात एक अभिनेत्री प्रमुख भूमिकेत होती. परंतु, 'जिस्म-3'मध्ये दोन अभिनेत्री प्रमुख भूमिकेत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सनी लिओनबरोबर नतालिया दिसणार याचीच चर्चा सुरू झाली आहे.
 
नथालियाच्या निवडीसंदर्भात पूजा भट्ट  सांगते, 'जिस्म-२ ' च्या पोस्टरमध्ये नथालिया कौरने काम केल्याचे समजल्यावर महेश भट्ट यांनी मला एसएमएस करून तिला 'जिस्म-3' मध्ये भूमिका देण्याची शिफारस केली. त्यांची सूचना टाळणे शक्‍य नाही. 'जिस्म-3' मध्ये सनी लिओन किंवा बिपाशा बसू असेल का, असे अनेक जण विचारत आहेत. परंतु, आताच याबाबत निश्‍चितपणे आता सांगणे कठीण आहे, असे पुजान स्पष्ट केले.
 
रामगोपाल वर्मा यांनी नथालिया कौरला बॉलिवूडमध्ये आणले. बॉलिवूडमधील काही  'आयटम सॉंग'मध्ये तिने काम केले आहे. सनी लिओन आणि रणदिव हुडा यांची प्रमुख भूमिका असलेल्या  'जिस्म-२ ' च्या पोस्टरमध्ये ती झळकली होती.
 
 

First Published: Wednesday, August 8, 2012, 03:29


comments powered by Disqus