Last Updated: Monday, December 19, 2011, 09:09
झी २४ तास वेब टीम 
येड्यांची जत्रा हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमामध्ये श्वेता तिवारीने ठसकेबाज लावणी सादर केली आहे. तसंच या लावणीचं वैशिष्ट्य म्हणजे सरोज खान यांनी ही लावणी कोरिओग्राफ केली आहे.
श्वेता तिवारीच्या कातिल अदा आपल्याला लवकरच येड्यांची जत्रा या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. लावणी म्हटली की साजशृंगार हा आलाच त्यामुळे या लावणीतही श्वेताला तसाच लूक देण्यात आला आहे. या लावणीतून श्वेता पहिल्यांदाच मराठी सिनेमात काम करते आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा अनुभव खूपच वेगळा होता. तसंच या लावणीचंआणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही लावणी प्रसिध्द कोरिओग्राफर सरोज खान यांनी कोरिओग्राफ केली आहे.
आज मराठी सिनेमांमध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. मात्र असं असलं तरी लावणीची गोडी काही कमी झालेली नाही त्यातच आता ही लावणी खुद्द सरोज खान यांनी कोरिओग्राफ केली आणि श्वेता तिवारीने त्यावर ताल धरला त्यामुळे या लावणीला अनोखा रंग चढला आहे हे काय वेगळं सांगायला हवं नको मात्र रसिकप्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देतात हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे
First Published: Monday, December 19, 2011, 09:09