Last Updated: Wednesday, December 21, 2011, 03:47
झी २४ तास वेब टीम 
मराठी सिनेसृष्टीतलं सध्याचं चर्चेत असलेलं कपल म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर. अनेक दिवस सोबत असलेलं हे जोडपं मंगळवारी लग्नगाठीत अडकलं. मुंबईत वरळीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. सिनेसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी या लग्नसोहळ्य़ाला उपस्थिती लावून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. तर इतरही अनेक सेलिब्रेटींनी या लग्नसोहळ्यात जमके धूमधमाल केली. ग्लॅमरस लग्नाला सेलिब्रिटींची हजेरी लावली होती. शुभमंगल सावधान !!! आदिनाथ-उर्मिला लग्नगाठीत अडकले आहेत.
आदिनाथ आणि उर्मिला हे लग्नगाठीत अडकले असले तरी गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांच्या प्रेमबंधनात अडकले होते. त्यांचा हा प्रेमविवाह आहे. 'शुभमंगल सावधान' या सिनेमातून एंट्री करणाऱ्या उर्मिलाने आजवर अनेक चांगल्या विषयावरील सिनेमात काम केले आहे.
महेश कोठारे यांच्या शुभमंगल सावधान या सिनेमाच्या सेटवरच आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लग्नाच्या गाठी जुळल्या. काही दिवसांपूर्वी प्रर्दशित झालेला 'दुभंग' मराठीतीतील अत्यंत 'बोल्ड' सिनेमा यात या जोडीने आपल्या अभिनयाने साऱ्यांचीच मने जिंकून घेतली. शुभमंगल सावधान म्हणत आदिनाथ आणि उर्मिला लग्नबेडीत अडकले, 'झी २४ तास' कडून त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
First Published: Wednesday, December 21, 2011, 03:47