डाकूच्या भूमिकेला खास 'आमिर' टच - Marathi News 24taas.com

डाकूच्या भूमिकेला खास 'आमिर' टच

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
वर्षाला एक किंवा फार फार तर दोनच सिनेमात काम करणाऱ्या आमिरने साकारलेल्या भूमिकांमधले वैविध्य थक्क करणारे आहे. सरफरोशमध्ये आयपीएस पोलिस ऑफिसर, फना मधला सॉफिस्टिकेटेड दहशतवादी, लगानचा भूवन, मंगल पांडेत क्रांतीकारक मंगल पांडेची भूमिका ही यादीच सर्व काही सांगून जाते.
 
आमिर आता 'धूम ३' मध्ये खलनायकाची भूमिका करणार आहे पण त्याही पेक्षा चर्चा रंगली आहे ती मकबूल खानच्या 'चंबळ सफारी'त तो डाकूची भूमिका करणार असल्याची. आमिर चंबळ खोऱ्यातल्या बचुआ डाकूची भूमिका साकारणार आहे. मकबूलने एक दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत तूर्तास एवढचं सांगु शकतो की आमिर या सिनेमात भूमिका करणार असल्याचं सांगितलं.  तसंच चंबळ सफारी ही एक ब्लॅक कॉमेडी सिनेमा आहे असल्याचं त्याने सांगितलं.
 
चंबळच्या खोऱ्यातले डाकूंच्या जीवनातल्या पडझडीच्या कालखंडाचे  चित्रण या सिनेमात करण्यात येणार आहे. मध्य प्रदेश सरकारने या डाकूंचे पुर्नवसन चंबळ सफारी या योजनेखाली केलं असून पूर्वाश्रमीचे डाकू त्यात टूरिस्ट गाईडचे काम करताना दाखवण्यात येणार आहेत.
 
 

First Published: Wednesday, December 21, 2011, 11:36


comments powered by Disqus