Last Updated: Saturday, December 24, 2011, 13:12
झी २४ तास वेब टीम, मुंबई सलमान खानचे वडील सलीम खान यांना सलमानच्या लग्नाचे वेध लागले आहेत. ४६ वर्षांच्या तरुण, लग्नाळू सलमानच्या वडलांची इच्छा आहे की सलमानने लग्न करून आता संसार करावा.
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सलमानचे वडील ज्येष्ठ संवाद लेखक सलीम खान म्हणाले की जोड्या स्वर्गात बनतात. पण, सलमानने आता आपली जोडीदार लवकरात लवकर मिळवावी. आता सलमानचं लग्न होणं आवश्यक आहे. यापूर्वीही सलीम खान यांनी बऱ्याचदा सलमानच्या लग्नाचा विषय काढला आहे.
या मुलाखतीत ते असंही म्हणाले की सलमानचे धाकटे बंधू सोहेल आणि अरबाझ यांची यापूर्वीच लग्नं झालेली आहेत. तेव्हा सलमानच्या लग्नासाठी मी आणखी वाट बघू शकत नाही.
अरबाझ आणि सोहेल खान हे तर आपल्या थोरल्या भावाच्या लग्नासाठी खूपच उत्सुक आहेत. खरंतर सलमानच्या संपूर्ण कुटुंबालाच सलमानच्या लग्नाची घाई झाली आहे. सलमानच्या मित्रपरिवारातील व्यक्तींनाही लवकरात लवकर सलमानच्या वरातीत नाचायची इच्छा आहे.
First Published: Saturday, December 24, 2011, 13:12