ए. आर. रेहमानांची गगनभरारी - Marathi News 24taas.com

ए. आर. रेहमानांची गगनभरारी

झी २४ तास वेब टीम
 
हॉलिवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांच्या सिनेमाला लवकरच ए आर रेहमान संगीत देणार आहेत. रेहमान यांच्यासह काम करण्याची इच्छा स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी व्यक्त केली होती आणि आता त्यांची ही स्वप्नपूर्ती लवकरच होणार आहे.
 
त्याच्या जादूई सुरवटींनी अख्या जगाला भुरळ घातली असल्याने ए आर रेहमान यांच्यासोबत काम करण्याची इच्छा ही स्टिव्हन स्पिलबर्ग यांना देखील होती. ए आर रेहमान. संगीतातलं एक असं नाव ज्याने सप्तसुरांच्या सामर्थ्यावर अख्खा जगाला कवेत घेतलं आहे. आणि आता अशीच गगन भरारी घेण्यासाठी ए आर रेहमान पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.
 
कारण साक्षात स्टिव्हन स्पिलबर्ग यांच्या सिनेमाला आता रेहमान संगीत देणार आहेत. वेलकम टू पिपल या सिनेमाला रेहमानच्या जादूई सुरांचा परिसस्पर्श होणार आहे. रेहमानसह काम करण्याची इच्छा स्टिव्हन यांनी याआधीच व्यक्त केली होती आणि आता लवकरच ही स्वप्नपूर्ती होणार असल्याने ते भलतेच खुश आहेत. खुद्द रेहमान देखील या सिनेमाबाबत खूपच एक्साईटेड आहे. संगीताला कुठलंच बंधन नसतं अगदी भाषेचंही हेच पुन्हा एकदा सिध्द होतं आहे.

First Published: Sunday, December 25, 2011, 15:51


comments powered by Disqus