'चिंटू'साठी पुण्यात बच्चेकंपनीच्या ऑडिशन्स - Marathi News 24taas.com

'चिंटू'साठी पुण्यात बच्चेकंपनीच्या ऑडिशन्स


झी २४ तास वेब टीम, पुणे
 
गेल्या वीस वर्ष वृत्तपत्रामधून मनोरंजन करणारा चिंटू मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. चिंटू सिनेमासाठीच्या ऑडिशन पुण्यात पार पडल्या. बच्चेकंपनीचा ऑडिशनला मोठा प्रतिसाद मिळाला.
 
चिंटूचं चित्रीकरण वीस जानेवारीपासून सुरू होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये म्हणजेच मे महिन्यात तो मोठ्या पडद्यावर झळकेल. आठ ते दहा वयोगटातील मुलांच्या ऑडिशन त्यासाठी घेण्यात आल्या. वृत्तपत्रातून चिंटू दररोज भेटतो. तो चिंटू साकारण्याची संधी मिळणार असल्यानं बच्चेकंपनी भारावून गेली होती.
 
 
चारूहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांच्या भन्नाट कल्पनेतून ‘चिंटू’ ही चित्रमालिका साकार झाली आहे. चिंटू, मिनी, बगळ्या यांची धमाल बघण्यासाठी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाची गीतं संदिप खरे लिहीत आहेत, तर संगीत डॉ. सलील कुलकर्णी यांचं आहे.
 
 

First Published: Monday, December 26, 2011, 08:33


comments powered by Disqus