अक्षयची नाराजी - Marathi News 24taas.com

अक्षयची नाराजी

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
‘दिल चाहता है’ सिनेमा हिट ठरला आणि या सिनेमामधून अक्षय खन्नाच्या अभिनयाचा वेगळा पैलू रसिकांसमोर आला.तीन मित्रांच्या मैत्रीवर हा सिनेमा आधारित होता आणि हे मैत्रीचे पैलू अक्षय खन्नाही उत्तमरित्या सिल्व्हर स्क्रीनवर साकारले. दिग्दर्शक म्हणून फरहान आख्तरचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा होता. मात्र या सिनेमात आमीर आणि सैफसह अक्षय खन्नानेही फरहानला छान साथ दिली होती.
 
या सिनेमानंतर अक्षय खन्नाची जोडी जुळली ती अब्बास मस्तानसह. अब्बास मस्तान या द्वयींसह अक्षयने हमराज, रेस हे सिनेमे केले आणि हे सिनेमेदेखील हिट ठरले. या दोन्ही दिग्दर्शकांसह अक्षयने हिट फिल्म्स देऊनही या दोघांनी अक्षयला पुन्हा आपल्या आगामी सिनेमामध्ये कास्ट केलं नाही आणि याबाबत अक्षयने आता नाराजी व्यक्त केलीय. नेहमी शांत आणि संयमी राहणारा अक्षय आता आपलं अँग्री मॅनचं रुप इंडस्ट्रीला दाखवतोय.
 
खरं तर असं इंडस्ट्रीमध्ये कोणीच उघडपणे नाराजी व्यक्त करत नाही. मात्र, अक्षयने असा नाराजीचा सूर लावण्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय. त्यामुळे अक्षयच्या या नाराजीबाबत अब्बास मस्तान आणि फरहान आख्तर आता काय उत्तर देतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.
 
 

First Published: Monday, December 26, 2011, 13:36


comments powered by Disqus