सलमानला आवडते सनी लिऑन? - Marathi News 24taas.com

सलमानला आवडते सनी लिऑन?

www.24taas.com, मुंबई
 
सनी लियोनचं बिग बॉस सिझन - ५शी असणारं नातं संपलं आहे. परंतु बॉलीवुड सोबत अनेक लोकांसोबत तिचं नातं जोडलं जात आहे. बिग बॉसमधून बाहेर पडण्याआधी सनी लियोनने फिल्ममेकर महेश भट्टला स्वत:कडे आकर्षित केलं होतं.
 
सनीबाबत आपण ताज्या रिपोर्टवर विश्वास ठेवल्यास असं दिसून येईल की, प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला देखील सनी लिऑन आवडू लागली आहे. बॉलिवूडच्या अफवांकडे लक्ष दिलं तर असं दिसतं की, सलमानाचा पुढील येणारा सिनेमा 'शेर खान' यात मॉडेल एंजेला जॉनसनला करारबद्ध करण्यात आलं आहे. मात्र आता त्या रोलसाठी आता बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. रियालिटी शोमध्ये सनी लिऑनची मसालेदार भूमिका आणि मिळालेली प्रसिद्धी यामुळे 'दबंग' खान याने या सिनेमाच्या लीड रोलसाठी पुन्हा विचार करायला सुरवात झाली आहे.
 
याचवेळेस सनी लिऑनने 'दबंग' खानसाठी तिची आवड असल्याचे जाहीर केलं आहे, तसचं सनीला सलमान खानसोबत डेट जाण्याचीही इच्छा असल्याचे म्हटलं आहे. जेव्हा तिला विचारलं गेलं की बिग बॉसच्या घरातील कोणत्या व्यक्तीसोबत जाण्यासाठी इच्छूक आहेस, तेव्हा सनीने सांगितलं की ती बिग बॉसमधील कोणात्याही सदस्यासोबत जाण्यास इच्छूक नाहीये. तिचं म्हणंण आहे की, बिग बॉसमधील सदस्यांपैकी डेटवर जाण्यासाठी कोणीच  नाहीये. सनीला हे चांगल्या प्रकारे माहीत आहे की बॉलिवूडच्या दुनियेत कसं चर्चेत राहावं
 

First Published: Wednesday, January 4, 2012, 21:42


comments powered by Disqus