Last Updated: Thursday, January 5, 2012, 19:04
www.24taas.com, मुंबई बिग बॉस-५ मधून देशभरात खळबळ निर्माण करणारी पॉर्न स्टार सनी लियॉन महेश भट्ट यांच्या जिस्म-२ मध्ये काम करत आहे हे तर आता नक्की झालं आहे. पण, यात ती नुसतंच काम करणार नसून या सिनेमात ती नग्न दृश्य देणार आहे.
सूत्रांकडून असं समजलं आहे की बिग बॉसमधून बाहेर पडल्यापासून जास्तीत जास्त वेळ सनी महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांच्याबरोबरच घालवत आहे. महेश भट्टांना सनीची पॉर्न स्टार इमेज कॅश करायची आहे हे उघड आहे. म्हणूनच त्यांनी सनीला या फिल्ममध्ये घेतलं आहे. सिनेमाच्या पहिल्याच सीनमध्ये नग्न पोझ द्यावी अशी पूजा भट्टची इच्छा आहे. यासाठी पूजा भट्टच्या फिशआय नेटवर्क या कंपनीने नुकतंच सनीचं न्यूड फोटो सेशन केलं. यात सनी एका पारदर्शक चादरीमध्ये झोपलेली आहे.
पूजाने सनीला आपल्याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि सनीकडून काय अपेक्षित आहे याची कल्पना दिली. सूत्रांच्या सांगण्यानुसार सनी लियॉन बॉलिवूडमध्ये काम करण्यास प्रचंड उत्सुक आहे आणि कॅमेरासमोर विवस्त्र होण्यात तिची काहीच हरकत नाही. महेश भट्ट यांनी तर सनीसाठी एक वेगळा करारच करवून घेतला आहे.
First Published: Thursday, January 5, 2012, 19:04