अभिनेत्री दिया मिर्झाला १.२५ लाखाचा दंड - Marathi News 24taas.com

अभिनेत्री दिया मिर्झाला १.२५ लाखाचा दंड

www.24taas.com मुंबई
 
अभिनेत्री दिया मिर्झा हिला सीमाशुल्क चुकविल्याप्रकरणी १.२५ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज शनिवार सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
 
बॉलीवूडमधील अभिनेते, अभिनेत्रींकडून सीमाशुल्क चुकवून मौल्यवान वस्तू परदेशातून आणण्याचा घटना नवीन नसताना आता आणखी एका  घटनेत भर पडली आहे. अभिनेत्री दिया मिर्झा बँकॉकहून मुंबईत आली. तिने बँकॉकहून २ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू  आणल्या होत्या.
 
मुंबईत आज पहाटे दोन वाजता ती बँकॉकहून थाई एअरवेजच्या विमानातून परतली होती. दिया मिर्झाच्या सामानाची तपासणी केली असता त्यामध्ये मौल्यवान  वस्तू आढळून आल्या. या वस्तू आढळल्याने तिला १.२५ लाख रूपयांचा दंड करण्यात आला. दंडाची रक्कम भरल्यानंतर दियाला विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. याआधी बिपाशा बासू, मिनिषा लांबा या अभिनेत्रींनाही दंड करण्यात आला होता.

First Published: Saturday, January 7, 2012, 14:20


comments powered by Disqus