अभिषेकच्या दहा लाख चाहत्यांचा टिवटिववाट - Marathi News 24taas.com

अभिषेकच्या दहा लाख चाहत्यांचा टिवटिववाट

www.24taas.com, मुंबई 
 
अभिषेक बच्चनला अत्यानंद झाला आहे. त्याला कारणही तसंच आहे. अभिषेकच्या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर त्याच्या चाहत्यांच्या संख्येने दहा लाखांचा ओलांडला आहे. अभिषेकने आपल्या चाहत्यांना त्यांचा पाठिंबा आणि प्रेमाच्या वर्षावाबद्दल धन्यवाद देणारा ट्विट पोस्ट केला आहे.
 
अभिषेकचे चाहते आहेत १,०००,०२९ आणि आजवर ट्विटची संख्या आहे १४,३८३ पण तरीही तो आपल्या वडिलांच्या बराच पिछाडीवर आहे. मेगास्टार अमिताभ बच्चनच्या मायक्रोब्लोगिंग साईटवर चाहत्यांची संख्या १,८९६,४१७ इतकी आहे.  बिग बी इथेही अव्वल स्थानावर आहेत त्यांनी प्रियांका चोप्राला मागे टाकलं, तिच्या चाहत्यांची संख्या १,८७४,८०२ आणि ट्विटस ५७१६ इतके आहेत.
 
 
 
 
 

First Published: Monday, January 9, 2012, 07:58


comments powered by Disqus