Last Updated: Wednesday, January 11, 2012, 16:54
www.24taas.com 
आसित रेडीज दिग्दर्शित 'गोल गोल डब्यातला' हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे. नावावरुन मजेशीर वाटणाऱ्या या गोल डब्यात दडलंय तरी काय? 'या गोल गोल डब्यातला' नावावरुन मजेशीर, गमतीशीर वाटणाऱ्या या सिनेमात दोन पिढ्यांमधला वैचारिक संघर्ष दाखवण्यात आला आहे.
वडिल आणि मुलाच्या नात्याभोवती सिनेमाचं कथानक फिरतं. गावोगावी जाऊन लहान मुलांना गोल गोल डब्यातला पिक्चर दाखवणाऱ्या बजाबा आणि त्याच्या मुलाची ही कथा. आसित रेडीज दिग्दर्शित या सिनेमात बजाबाची प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहेत अशोक सराफ तर त्यांच्या मुलाच्या भूमिकेत आहे संतोष जुवेकर.
त्याशिवाय स्मिता तळवलकर, संतोष जुवेकर, स्मिता शेवाळे, आशालता वाबगावकर, विजय चव्हाण यांच्याही या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. विशेष म्हणजे, अशोक सराफ यांच्या आवाजाची जादूही सिनेमात ऐकायला मिळणार आहे. तेव्हा या गोल गोल डब्यातला हा खराखुरा सिनेमा प्रेक्षकांना आवडतो का याचीच प्रतिक्षा करुया.
First Published: Wednesday, January 11, 2012, 16:54