सनी लिऑनला काळजी 'पॉर्न करीअर' संपण्याची ! - Marathi News 24taas.com

सनी लिऑनला काळजी 'पॉर्न करीअर' संपण्याची !

www.24taas.com, मुंबई
 
बॉलिवूडमध्ये मोठी संधी दिल्यावरही सनी लिऑन हिने गोंधळात पडण्याचं नेमकं कारण काय हे दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या लक्षात येत नाही. पण, सनीच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे.
 
बॉलिवूडचे दरवाजे उघडल्यावर आता सनीला यापुढे अमेरिकेतील पॉर्न फिल्म इंडस्ट्रीत काम करायची इच्छा नव्हती. पण जिस्म -२ ची दिग्दर्शिका पूजा भट्टशी बोलणी झाल्यावर आता सनीचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे.
 
“महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांच्याशी बोलून मला खूप आनंद झाला, पण तरीही मी त्यांचा सिनेमा करायचा की नाही, हे अजून ठरवलेलं नाही. माझ्या अमेरिकेतल्या ‘प्रौढांसाठी’ असणाऱ्या सिनेमांच्या बिझनेसवर माझ्या बॉलिवूड पदार्पणामुळे काय परिणाम होतोय, ते पाहूनच मी पुढचा निर्णय घेईन.”  असं सनीने एका दैनिकाला सांगितलं.
 
पूजा भट्टनेसुद्धा आता जिस्म-२ बद्दल वेगळ्याच योजना आखायला सुरूवात केली आहे. “जिस्म-२ मध्ये सनी लिऑन काम करणार की बिपाशा बासू हे गुपित मी इतक्यात कोणाला सांगणार नाहीये, पण हे मात्र खरं की अजून कुणाचंही नाव यासाठी नक्की केलं गेलेलं नाही. ते नाव मी लवकरच जाहीर करेन. सनीबरोबर झालेल्या आमच्या मीटींग्जमध्ये सनीचा प्रतिसाद सकारात्मक होता. ”
 
आधी झालेल्या मुलाखतीत सनी लिऑन म्हाणाली होती, “महेश भट्टांनी दिलेल्या ऑफरमुळे मी खूपच खूश आहे. मला या सिनेमात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळतेय. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी हिच योग्य संधी आहे. जर सगळ्या गोष्टी जमून आल्या तर मला बॉलिवूडमध्येच करीअर करायला आवडेल. ”
 
 

First Published: Wednesday, January 11, 2012, 20:12


comments powered by Disqus