नक्षलवादावर मराठी चित्रपट - Marathi News 24taas.com

नक्षलवादावर मराठी चित्रपट

www.24taas.com ,मुंबई
 
दहशतवादाच्या समस्येवर हिंदी आणि मराठीसह अन्य भाषांतही चित्रपट आले आहेत. आता नक्षलवादावर 'दलम... जर्नी ऑफ नक्षलबारी' हा मराठी चित्रपट येत आहे.
 
'रेड कार्पेट सिल्व्हर प्रॉडक्‍शन्स प्रा. लि.' या बॅनरखाली निर्माते प्रशांत घुले आणि दिग्दर्शक प्रवीण भोईर हा चित्रपट बनवणार आहेत. प्रवीण भोईर यांनी शिबू मिश्रा, गौतम अधिकारी अशा दिग्दर्शकांकडे सहायक म्हणून काम केले आहे. प्रशांत घुले आणि प्रवीण भोईर यांनी एकत्र येऊन  'रेड कार्पेट' कंपनी स्थापन केली असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
 
समीर धर्माधिकारी, क्रांती रेडकर, किशोर नांदलस्कर, पूजा सावंत आदी कलाकार या चित्रपटात काम करत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण गडचिरोलीसह अन्य काही नक्षलग्रस्त भागांतही केले जाणार आहे.
 
या चित्रपटाच्या चित्रिकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. भोईर यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून मिलिंद इंगळे यांनी संगीत दिले आहे. गेली पाच-सहा वर्षे  या गंभीर आणि संवेदनशील विषयाचा अभ्यास दिग्दर्शक प्रवीण भोईर करत आहेत.

First Published: Saturday, January 14, 2012, 16:05


comments powered by Disqus