अशोक सराफ अपघातातून बचावले - Marathi News 24taas.com

अशोक सराफ अपघातातून बचावले

www.24taas.com, मुंबई
ख्यातनाम अभिनेते अशोक सराफ आणि संतोष जुवेकर हे दोघे मुंबई-पुणे एक्सप्रेसवरी एका अपघातात बालबाल बचावले. ‘गोल गोल डब्यातला’ या मराठी सिनेमाच्या पत्रकार परिषदेसाठी पुण्याला जाताना तळेगावचा बोगदा क्रॉस करताना ही घटना घडली. गाडीत वेगात असतानाचा मागचा टायर फुटला त्यामुळेच केवळ नशीबाने मोठा अनर्थ टळला. या गाडीत अशोक सराफ, संतोष जुवेकर यांच्यासह दिग्दर्शक असित रेडीज आणि संगीतकार सतीश चंद्र देखील होते. याआधीही अशोक सराफ एका मोठ्या अपघातातुन वाचले आहेत.
 
आजवर वाहन अपघातात मराठीतील दिग्गज अभिनेते अरुण सरनाईक, जयराम हर्डीकर, अभिनेत्री शांता जोग, भक्ती बर्वे मृत्यूमुखी पडल्या आहेत. तर रंजनाला अपघातामुळे कायमचं अपंगत्व आलं होतं.
 
 
 
 
 

First Published: Sunday, January 15, 2012, 16:04


comments powered by Disqus