पूनमने उडवली बाबा रामदेवांची खिल्ली - Marathi News 24taas.com

पूनमने उडवली बाबा रामदेवांची खिल्ली

www.24taas.com, मुंबई
 
सवंग लोकप्रियतेसाठी चर्चेत राहणाऱ्या मॉडेल पूनम पांडेने आता रामदेव बाबांची टर्र उडवली आहे. शनिवरी बाबा रामदेव यांच्या चेहऱ्यावर कामरान सिद्दिकीने काळी शाई फेकली होती. या घटनेची चेष्टा करताना पूनमने आधी ट्विटरवर लिहीलं होतं, “रामदेवांसाठी काळा दिवस, एका तरुणाने योगगुरूंवर शाई फेकली, खरंच ?”
 
यानंतर जेव्हा घटनेबद्दल निश्चित माहिती पुढे आली तेव्हा पूनमने पुन्हा ट्विटर वर बाबा रामदेव यांची खिल्ली उडवली. बाबा रामदेव यांची टिंगल करत तिने ट्विट केलं, “बाबा रामदेवांच्या डाव्या डोळ्यामध्ये असणाऱ्या खराबीमुळे त्या तरुणाचा गैरसमज झालेला दिसतोय. त्याने विचार केला असेल, बुरी नजरवाले तेरा मुँह काला... ”
 
पूनम पांडे आपल्या आशा वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत रहाते. गेल्या वर्षी क्रिकेट वर्ल्ड कपच्या सुमारास तिने घोषित केलं होतं की टीम इंडिया जर वर्ल्ड कप जिंकली तर मी नग्न होईन. अर्थात, टिम इंडिया जिंकल्यावर तिने असं काही केलं नाही. मात्र, वर्ल्ड कपच्या तव्यावर तिने स्वतःची पोळी भाजून घेतली आणि सवंग लोकप्रियता मिळवली.
 
याशिवाय यू-ट्युबवर आपलेच उत्तान व्हिडिओ अपलोड करून तिने आपलं नाव चर्चेत ठेवलं होतं. टीम इंडियाचा उत्साह वाढवण्याच्या नावाखाली ट्विटरवर स्वतःची अर्धनग्न छायाचित्रं अपलोड केली होती. राखी सावंतने यापूर्वी बाबा रामदेवांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करून चर्चेत राहाण्याचा प्रयत्न केला होता..

First Published: Monday, January 16, 2012, 11:26


comments powered by Disqus