Last Updated: Friday, October 21, 2011, 07:30
झी 24 तास वेब टीम, मुंबई 
एखाद्या सिनेमाचं रिमेक करणं हे बॉलिवूडमध्ये सर्रास चालत आलयं. आणि आता रिमेक होतोय चक्क मराठी सिनेमाचा. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फिल्मचं रिमेक करण्यासाठी लाखो दिलो की धडकन असणारा सलमान खान पुढे सरसावला आहे. महेश मांजरेकरांच्या मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या हिट फिल्मचा आता रिमेक येतोय आणि तोही हिंदीमध्ये.
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, सुचित्रा बांदेकर, प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या सिनेमाच्या रिमेकला आता हातभार लावणार आहे अभिनेता सलमान खान. सलमान खानने या सिनेमाचा हिंदी रिमेक प्रोड्युस करण्याचा निर्णय घेतला आहे. या हिंदी रिमेकमध्ये सलमान अभिनय करत नसला तरी देखील महेश मांजरेकरांच्या मैत्रीखातर सलमान ही फिल्म प्रोड्युस करणार आहे. जसा हा सिनेमा मराठीत सुपरडूपर हिट ठरला त्याचप्रमाणे हिंदीतही अशीच कमाल करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
First Published: Friday, October 21, 2011, 07:30