जॉन ये तूने क्या किया? - Marathi News 24taas.com

जॉन ये तूने क्या किया?

www.24taas.com, मुंबई
 
देशभरात अनेक मुलींची हृदये विदीर्ण झाली आहेत. अनेकांच्या डोळ्यातून आसवं गळायची थांबतच नाही आहेत. अनेकांनी जेवण टाकलं आहे. अनेक ललनांनी हाय खाल्ली आहे. अहो का म्हणून काय विचारता जॉन अब्राहामने लग्न केल्याच्या बातमीने एकच हाहाकार माजवला आहे. जॉनसाठी उसासे टाकणाऱ्या ललनांना दुःख वेग आवरता येत नाही आहे.
 
बिपाशा बसुशी ब्रेकअप झाल्यानंतर जॉन अब्राहामने जाहीररित्या लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचं मान्य केलं होतं. फायनानशियल ऍनालिस्ट असलेल्या प्रिया रुंचाल या आपल्या गर्लफ्रेंड समवेत अनेक पार्टीजमध्येही त्याने हजेरी लावली होती.
 
जॉन आणि प्रिया यांच्या निकट असलेल्यांनी २०१२ च्या मध्यावर ते लग्न करणार असल्याचं सूचित केलं होतं. पण या दोघांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत विवाह केल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. लॉस एंजेलिसमध्ये एका घाई गडबडीत उरकलेल्या समारंभाला प्रियाच्या कुटुंबियांनी हजेरी लावली होती असं समजतं. पण अद्याप जॉनने विवाह केल्याचं जाहीररित्या मान्य केललं नाही.
 
विवाह संस्थेबद्दल जॉन काही दिवसांपूर्वी भरभरून बोलला होता. विवाह संस्थेबद्दल प्रचंड आदर असल्याचंही त्याने सांगितलं होतं. पण खाजगी आयुष्याबद्दल जाहिररित्या बोलायला त्याने नकार दिला होता.
 
आता जॉनला लग्न केल्याची बातमी गुप्त ठेवायची असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  याआधी त्याच्या आणि बिपाशाच्या अफेअर विषयी बरचं गॉसिपिंग झाल्यामुळे तो ही काळजी घेत असावा.
 
 

First Published: Wednesday, January 18, 2012, 16:15


comments powered by Disqus