'सतरंगी रे'... गोव्यात सुरू असा.. - Marathi News 24taas.com

'सतरंगी रे'... गोव्यात सुरू असा..

www.24taas.com, गोवा
 
आदिनाथ, भूषण, सिद्धार्थ, निखील ही यंग ब्रिगेड आपल्याला दिसणारे 'सतरंगी रे' या अपकमिंग मराठी सिनेमात. ही युथ गॅँग जेव्हा गोव्यात शूटिंग करत होती तेव्हा काय धमाल आली. गोव्यात शूटिंग म्हणजे तर मग आता विचारायलाच नको, नुसती धमाल आणि मस्ती. पुणेरी पुणेकर असलेल्या सिद्धार्थने गोवन भाषा शिकायला देखील सुरवात केली आहे.
 
'सतरंगी रे'च्या यंग ब्रिगेडने गोव्यातलं शूटिंग एन्जॉय तर केलंच पण बाकी राहिल्या काही अविस्मरणीय आठवणीदेखील त्यांनी सांगितल्या. आदिनाथसाठी हे शूटिंग कधीच विसरू शकणार नाही. एकंदर गोव्यात फुल टू धमाल सुरु होती तर. अमृतासाठीही गोवा हे तिचं आवडतं ठिकाण आहे.

First Published: Wednesday, January 18, 2012, 21:24


comments powered by Disqus