Last Updated: Wednesday, January 25, 2012, 18:14
www.24taas.com, मुंबई अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता आपल्या पतीच्या अग्नीपथमधील अभिनयावर बेहद्द खुश आहे. २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या अग्नीपथमध्ये संजय दत्त कांचा हे पात्र साकारत आहे. १९९०मध्ये जेव्हा पहिल्यांदा अग्नीपथ रिलीज झाला तेव्हा ही भूमिका डॅनी डेग्झोंपा याने साकारली होती. प्रेक्षक यापूर्वीच संजय दत्तच्या कांचाच्या लूकवर आणि अभिनयावर फिदा झाले आहेत.
अग्नीपथच्या स्पेशल स्क्रीनींगच्या वेळी मान्यता पत्रकारांशी बोलताना म्हणाली, “या सिनेमातील संजयची भूमिका आणि अभिनय मला खूप आवडला. प्रत्यक्षात संजय अत्यंत स्वच्छ मनाचा आणि चांगला माणूस आहे. सिनेमात मात्र त्याने आपल्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या विरुद्ध भूमिका वठवली आहे. त्याने आपली भूमिका अगदी मनापासून सादर केली आहे.” सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी निर्माता करण जोहर याने मुंबईतील सेलिब्रिटींसाठी विशेष शोचं आयोजन केलं होतं.
या आधीच्या एका मुलाखतीत सांगितलं की मान्यता माझ्या कामात ढवळाढवळ करत नाही. मात्र, माझ्या कामाबद्दल प्रामाणिक प्रतिक्रिया नेहमी देते. मी जर एखादा निरर्थक सिनेमा केला तर ती कधीही त्याचं कौतुक करत नाही. ती कधीही खोटी स्तुती करत नाही असं संजय दत्तचं म्हणणं आहे.
First Published: Wednesday, January 25, 2012, 18:14