Last Updated: Sunday, January 29, 2012, 15:45
www.24taas.com 
रिमा कागदी दिग्दर्शित तलाश सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे या सिनेमात आमीर खान, राणी मुखर्जी, करीना कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या सिनेमातील आमीरच्या लूकची खूपच चर्चा होते आहे.
आमीर खानच्या सिनेमाची त्याच्या फॅन्सला नेहमीच उत्सुकता असते आणि आता आमीर असं आपल्या फॅन्सला सरप्राईज करणार आहे तो आगामी तलाश सिनेमातून. या सिनेमातील आमीरच्या लूकची खूपच चर्चा झाली. आपल्या प्रत्येक सिनेमामध्ये आमीर हटके लूकमधून आपल्या समोर येतो तसा तो याही सिनेमामधून येणार आहे या सिनेमामध्ये आमीर पोलीस ऑफिसरची भूमिका साकारतो आहे त्यामुळे त्याला साजेसा आमीरने लूक ठेवला आहे. विशेष करून आमीरने या लूकसाठी मिशीला अधिक प्राधान्य दिलं आहे.
आमीरसह या सिनेमामध्ये राणी मुखर्जी आणि करीना कपूरही प्रमुख भूमिका साकारत आहेत. राणी या सिनेमात साध्या लूकमधून आपल्या समोर येणार आहे तर करीना कपूर नेहमी प्रमाणेच ग्लॅमरस लूकमधून आपल्या भेटीला येणार आहे. तलाश या शिर्षकावरूनच हा एक सस्पेन्स थ्रीलर सिनेमा असल्याचं अधोरेखित होतं आहे.
First Published: Sunday, January 29, 2012, 15:45