Last Updated: Friday, October 28, 2011, 04:57
झी २४ तास वेब टीम 
बॉलिवूडमध्ये अनेक वेळा लैंगिक शोषण केले जाते, असे अनेक न्यूकमर्सच म्हणंण असतं, पण सायली भगत हिने थेट 'बिग बी' अमिताभ यांना टार्गेट करत 'बिग' आरोप केले आहेत. त्यामुळे अमिताभ कमालीचे नाराज झाले आहेत. यांचीच खंत त्यानी टि्वटरवर व्यक्त केली आहे
ग्लॅमरस गर्ल सायली भगत हिने बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या खोट्या आरोपामुळे नाराज झाल्याचे अमिताभ बच्चन यांनी ट्विटर वरुन ट्विट करुन जाहीर केले आहे.
निव्वळ प्रसिद्धीसाठी कोणावर बिनबुडाचे आरोप करू नयेत. आरोप करण्याआधी संबंधित व्यक्तीने आपल्या बोलण्यात किती तथ्य आहे आणि आपण कोणावर आरोप करत आहोत, याचे तरी भान ठेवायला हवे होते, असे सांगत अमिताभ यांनी सायली विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
सायलीच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे मला प्रचंड मनस्ताप झाला आहे. शेवटी माझ्याही सहनशक्तीला मर्यादा आहे, असेही अमिताभ यांनी सांगितले.
इंग्रजी आणि हिंदी भाषेत ट्विट करुन अमिताभ यांनी सायली भगतच्या कृतीविषयी राग आणि नाराजी व्यक्त केली आहे. फेक आयडी तयार करुन सोशल नेटवर्कवरुन माझ्याविषयी बनावट माहिती देणा-यांविरोधात लवकरच कारवाई करणार आहे, असेही अमिताभ बच्चन म्हणाले.
First Published: Friday, October 28, 2011, 04:57