शाहरुखने भर पार्टीत फराहच्या नवऱ्याला मारलं - Marathi News 24taas.com

शाहरुखने भर पार्टीत फराहच्या नवऱ्याला मारलं

 www.24taas.com, मुंबई
 
अग्निपथ सिनेमाच्या यशाबद्दल संजय दत्तने आयोजित केलेल्या पार्टीत शाहरुख खानने आपल्या एकेकाळची मैत्रीण असलेल्या फराह खानच्या नवऱ्याच्या म्हणजेच दिग्दर्शक शिरीष कुंदरच्या जोरदार थप्पड मारली.
 
ही घटना रविवारी रात्री घडली. संजय दत्तकडील पार्टीत शाहरुख आणि शिरीष कुंदर यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. शिरीष कुंदरही शाहरुखच्या विरोधात बोलत होता. मात्र, अनेक प्रयत्न करूनही या प्रकरणावर शाहरुख खानची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
 
फराह खान आणि शिरीषने यासंदर्भात काही गोष्टी सांगितल्या असल्या तरी शाहरुख खान विरोधात पोलिसांत तक्रार करण्याची मात्र त्यांची इच्छा नाही. फराह म्हणाली, “शाहरुख नेहमी मला म्हणायचा की मारामारी हा कुठलीही समस्या सोडवण्याचा सगळ्यात वाईट उपाय आहे. जर कोणी अशा पद्धतीने वागत असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती आपल्या व्यक्तिगत किंवा कामामधील ताणताणावांशी झुंजत आहे. याच कारणामुळे शाहरुखला अशा अवस्थेत पाहून मला खूप दुःख होतंय.”
 
शिरीषनेही ट्विटरवर लिहीलं आहे “तुम्हा सर्वांच्या काळजीबद्दल आभार. मी तुमचे मनापासून आभार मानतो. पोलिसांत तक्रार करण्याचा आमचा अजिबात विचार नाही. या सर्व अफवा आहेत.”
 
शाहरुख आणि फराह पूर्वी एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स होते. शाहरुख खानची निर्मिती असलेल्या मै हूँ ना आणि ओम शांती ओमचं दिग्दर्शनही फराह खानने केलं होतं. पण, २०१० मधील 'तीस मार खाँ' सिनेमात अक्षय कुमारला घेतल्यावर फराह आणि शाहरुखचे संबंध बिघडले.
 
शिरीष कुंदरच्या आगामी ‘जोकर’ सिनेमात शाहरुखने खाम करण्यास नकार दिल्यावर हे संबंध आणखी बिघडले. शिरीष आणि शाहरुख हे देखील आधी चांगले मित्र होते. मात्र ट्विटरवर बॉलिवूडच्या दिग्गजांवर तोंडसुख घेण्याच्या शिरीषच्या सवयीमुळे शिरीष आणि शाहरुखमधले संबंध आणखी बिघडले. नुकतंच शिरीषने शाहरुखच्या ‘रा.वन’चीही वाटेल तशी खिल्ली उडवली होती.
 
तरीही पार्टीला हजर असलेल्या बऱ्याच जणांनी शाहरुखचं समर्थन केलं आहे.
 
अमिषा पटेलने ट्विटरवर लिहीलं, “लोकांनी शाहरुखचे आभार मानले पाहिजेत. शाहरुखने फराहला खूप मदत केली आहे. तेव्हा फराहने शाहरुखला शिव्या न देता शाहरुखचे आभारच मानले पाहिजे.  ”
 
सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीने ट्विट केलं आहे, “मीसुद्धा संजूच्या पार्टीत होतो. आणि कुठलाही पक्षपात न करता मी शाहरुखचं समर्थन करतोय.”
 

First Published: Tuesday, January 31, 2012, 16:50


comments powered by Disqus