प्रियंका चोप्राही शिकणार 'मराठी'! - Marathi News 24taas.com

प्रियंका चोप्राही शिकणार 'मराठी'!

www.24taas.com, मुंबई
 
प्रियंका चोप्राचं 'अग्निपथ'मधील काम जास्त नसलं तरी ‘काली’च्या भूमिकेतला तिचा अभिनय वाहवा मिळवून गेला. डॉन-२ सिनेमातील तिची भूमिका लक्षात राहण्याऐवजी तिची आणि शाहरुखची जवळीकच चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, अग्निपथमध्ये तिची मराठी काली पुन्हा एकदा लोकांना आवडून गेली आहे.
 
शाहरुखसोबतच्या वादग्रस्त मैत्रीनंतर या वर्षाची सुरूवात प्रियंकासाठी चांगली ठरली आहे. कमिनेमधील ‘स्वीटी’च्या मराठमोळ्या भूमिकेनेही प्रियंकाच्या अभिनयसामर्थ्याची साक्ष दिली होती आणि लोकप्रियताही वाढवली होती. त्यानंतर तो योग अग्निपथमध्येच आला. अग्निपथमध्येही प्रियंकाच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. लोकप्रियता वाढत आहे. गंमत म्हणजे दोन्ही सिनेमांत प्रियंका चोप्रा मराठी मुलगी बनली होती.
 
‘स्वीटी’च्या आणि ‘काली’च्या भूमिकेत बघितल्यावर अजूनही तिचे फॅन्स तिला मराठी मुलीच्या भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहेत. प्रियंकालाही मराठी मुलगी साकारताना खूप आनंद झाला होता. नवनवे निर्मातेही तिला मराठी मुलीच्या भूमिकाच ऑफर करत आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून ‘युपी’च्या प्रियंकाने आता कामचलाऊ मराठी न बोलता नीट मराठी शिकण्याचा निर्णय घेतला आहे.
 
सध्या प्रियंका रणबीर कपूरबरोबरच्या ‘बर्फी’ सिनेमाच्या डबिंगमध्ये व्यस्त आहे. यानंतर क्रिश-२ सिनेमाचं शुटींग आणि डबींगमध्ये प्रियंका बिझी होईल. मात्र, यानंतरचा संपूर्ण वेळ प्रियंका मराठी शिकण्यात घालवणार आहे. लोकप्रियतेच्या निमित्ताने का होईना, मूळच्या उत्तर प्रदेशातल्या ‘बरेली’मधील असणाऱ्या प्रियंकाला आता मराठीबद्दल प्रेम निर्माण झालं आहे, हेच कौतुकास्पद आहे.
 
 

First Published: Tuesday, January 31, 2012, 18:29


comments powered by Disqus